योगसिध्दी समुहातर्फे शेणी दान

योगसिध्दी समुहातर्फे शेणी दान

ich171.jpg
89629
इचलकरंजी : योगसिध्दी समुहातर्फे पंधराशे शेणी दान केल्या.

योगसिध्दी समुहातर्फे शेणी दान
इचलकरंजी : चंदूर येथील सामाजिक क्षेत्रात सदैव कार्यरत असणाऱ्‍या योगसिध्दी समुहाकडून इचलकरंजी स्मशानभूमीला अंत्यविधीसाठी पंधराशे शेणी दान केल्या. सामाजिक कार्याची जाणीव ठेवत योगसिद्धी समुह कार्य करत आहे. त्यातूनच हा उपक्रम हाती घेतल्याचे योगसिद्धी समुहाचे अध्यक्ष बंडा पुजारी यांनी सांगितले. संतोष पुजारी, निवास कदम, कृणाल निकम, बाबु वाघमोडे, सचिन पाटील, श्रीनिवास कुंभार, नितीन रेंदाळे, सदाशिव सुतार, संतोष मंगसुळे आदी उपस्थित होते.
------------------------------
ich172.jpg
89630
इचलकरंजी : सेवासदन हॉस्पिटल व इचलकरंजी बार असोसिएशन पदाधिकाऱ्यांनी शिबिराचे नियोजन केले.

''सेवा सदन हेल्थ’मध्ये हॅपी हार्ट शिबिर
इचलकरंजी : सेवासदन हेल्प प्लस हॉस्पिटल इचलकरंजी व इचलकरंजी बार असोसिएशनतर्फे शहरातील वकिल व त्यांच्या परिवारासाठी हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरामध्ये ईसीजी, शुगर तपासणी व बी.एम.आय मोफत करण्यात येणार आहेत. महिला वकिलांसाठी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळणार आहे. शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटल चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज बावणे यांनी केले. बार असोसिएशनचे अध्यक्ष शिवराज चिडमुंगे, डॉ. रविकांत पाटील, जनसंपर्क अधिकारी मुकेश कांबळे, जिल्हा न्यायाधीश आर. एन. आंबटकर, ॲड. डी. एम. लटके, ॲड. राजीव शिंगे, ॲड. नीता परीट, ॲड. शिवकुमार लकडे, ॲड. रमेश जमदाडे, ॲड. असिफ मुल्ला, ॲड. अनुराग कुलकर्णी, ॲड. सुधीर मस्के आदी उपस्थित होते.
--------------------------
ich173.jpg
89633
इचलकरंजी : काम बंद आंदोलनाच्या चौथ्या दिवशी प्रांत कार्यालया बाहेर शिक्षक संघटनांच्याकडून थाळी नाद करण्यात आला.

शिक्षक संघटनांकडून थाळी नाद
इचलकरंजी : राज्यातील सर्व शासकीय व निमशासकिय कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शिक्षक संघटनांनी थाळी वाजवून निदर्शने केली. उपस्थित कर्मचाऱ्‍यांनी पेन्शन का गरजेची आहे याची माहिती दिली. मात्र शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन लांबत असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.
-------------
‘बालाजी’मध्ये बालकला प्रदर्शन
इचलकरंजी : बालाजी बालमंदिरामध्ये बालकला प्रदर्शन भरवले होते. ‘खेळ गोष्टी गप्पा गाणी, बालमेंदूचे अन्नपाणी’ हे प्रदर्शनाचे ब्रीदवाक्य होते. प्रदर्शनामध्ये भाषा, गणित इंग्रजी व परिसर या विषयांचे साधनाद्वारे हसत- खेळत आनंददायी शिक्षण कसे असावे यांची सुंदर मांडणी केली होती. बालविकास प्रकल्प अधिकारी सुजाता शिंदे, मदन कारंडे, रमेशचंद्र बांगड, मुख्याध्यापिका रंजना घोरपडे, वैशाली शिंदे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com