शिंदे इंजिनिअरिंगमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिंदे इंजिनिअरिंगमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
शिंदे इंजिनिअरिंगमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

शिंदे इंजिनिअरिंगमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

sakal_logo
By

gad179.jpg
89733
भडगाव : डॉ. ए. डी. शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील मेळाव्यासाठी उपस्थित माजी विद्यार्थी व शिक्षक.
---------
शिंदे इंजिनिअरिंगमध्ये
माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
गडहिंग्लज, ता. १७ : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील डॉ. ए. डी. शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात झाला. संस्थेचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे, सचिव स्वाती कोरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
विविध कंपन्या, शासकीय, उद्योजक, बांधकाम व्यवसायिक असलेले अनेक माजी विद्यार्थी जुन्या आठवणीत रमले होते. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रतीक कोरी, उपाध्यक्ष सुमित देसाई, प्रसाद ढोकरे, रणजित पाटील, विश्वजित एकले यांनी मनोगत व्यक्त केले. सकाळ-यिनचे नूतन अध्यक्ष अवधूत गायकवाड व उपाध्यक्ष आदित्य देसाई यांचा सत्कार केला. संस्थेचे सल्लागार महेश कोरी, प्राचार्य किशोर जोशी, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. अमित शेळके यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य जोशी यांनी स्वागत केले. मुख्य समन्वयक प्रा. अभय देसाई यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शरद किल्लेदार यांनी आभार मानले.