प्रांत कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांचा ठिय्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रांत कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांचा ठिय्या
प्रांत कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांचा ठिय्या

प्रांत कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांचा ठिय्या

sakal_logo
By

89685
गडहिंग्लज : जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
-----------------------
प्रांत कार्यालयासमोर
कर्मचाऱ्यांचा ठिय्या
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १७ : जुन्या पेन्शन योजनेच्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. संपात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आज ठिय्या आंदोलन केले. येथील प्रांत कार्यालयासमोर सुमारे तासभर ठिय्या मारला.
येथील पंचायत समितीच्या आवारात सकाळी अकरापासून कर्मचारी जमू लागले. तेथून मोर्चाला सुरुवात झाली. कचेरी रोड, मुख्य मार्गावरून मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. गुरुवारी (ता. १६) कर्मचाऱ्यांनी मूक मोर्चा काढला होता. त्यामुळे शांतता होती; पण आज जोरदार घोषणाबाजी केली. पेन्शनच्या मागणीसह शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. प्रांत कार्यालयाच्या दारातच कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मारला. सुमारे तासभर कर्मचारी बसून होते. माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, राजू नाईक, अयाज बागवान, तानाजी जत्राटे, प्रा. आशपाक मकानदार यांची भाषणे झाली.
दरम्यान, संपातील कर्मचाऱ्यांकडून दिवसागणिक आंदोलनाची तीव्रता वाढवली जात आहे. त्याचाच भाग म्हणून उद्या (ता. १८) घंटानाद आंदोलन केले जाणार आहे. पंचायत समितीपासून आंदोलनाला सुररुवात होईल. शहरातून फिरून कर्मचारी प्रांत कार्यालयावर येणार आहेत. आंदोलनादरम्यान घंटा नाद करीत मागण्यांकडे लक्ष वेधणार आहेत.
----------------------------
gad174.jpg
89686
गडहिंग्लज : आंदोलनस्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंब्याचे पत्र देताना शिवसेनेचे पदाधिकारी.
-----------------------
कर्मचाऱ्यांच्या संपाला
शिवसेनेचा पाठिंबा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १७ : जुन्या पेन्शन योजनेसाठी शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपाला गडहिंग्लज तालुका व शहर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पाठिंबा दिला आहे. पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंब्याचे पत्र दिले. शासन जाणून-बुजून कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप केला आहे.
अनेक दिवस शासकीय-निमशासकीय कर्मचारी सनदशीर मार्गाने आंदोलन करीत आहेत. पण, राज्य सरकार त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणताही प्रयत्न करताना दिसत नाही. जाणीवपूर्वक आंदोलनाकडे कानाडोळा करीत आहे. कंत्राटी पद्धतीने भरती करण्याची भीती दाखवून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. हुकूमशाही पद्धतीने निर्णय जनतेवर लादण्याचे काम भाजप-शिंदे सरकार करीत असल्याचा आरोप पत्रकातून केला आहे.
सहसंपर्क प्रमुख सुनील शिंत्रे, तालुकाप्रमुख दिलीप माने, शहरप्रमुख संतोष चिक्कोडे, दिगंबर पाटील, वसंत नाईक, राजू डोंगरे, मल्लिकार्जुन चौगुले, प्रतिक क्षीरसागर, मारुती कमते, संभाजी येडूरकर, काशिनाथ गडकरी आदींच्या पत्रावर सह्या आहेत.