लक्ष्मी पतसंस्था अध्यक्षपदी पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लक्ष्मी पतसंस्था अध्यक्षपदी पाटील
लक्ष्मी पतसंस्था अध्यक्षपदी पाटील

लक्ष्मी पतसंस्था अध्यक्षपदी पाटील

sakal_logo
By

89691
----------------------------------------------------------------
लक्ष्मी पतसंस्था अध्यक्षपदी पाटील
गडहिंग्लज : मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील लक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बाबासाहेब पाटील, तर उपाध्यक्षपदी पुंडलिक आरबोळे यांची एकमताने निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. एम. तोडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळ बैठकीत ही प्रक्रिया झाली. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. नूतन संचालक मंडळामध्ये बाबासाहेब पाटील, गणपती भोसले, सुबराव जगदाळे, रामू माने, पुंडलिक आरबोळे, विक्रम शिंदे, रमेश कांबळे, मारुती सुतार, सुरेश घस्ती, लक्ष्मीबाई मुसळे, कांचन चौगुले यांचा समावेश आहे. अध्यक्ष पाटील व उपाध्यक्ष आरबोळे यांचा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. तोडकर यांच्या हस्ते सत्कार झाला. सचिव वसंत मुसळे यांनी आभार मानले.
---------------------------------------------------------

89692

----------------------------------------------------------------
श्रीकृष्ण पतसंस्था अध्यक्षपदी व्हसकोटी
नूल : गडहिंग्लजच्या श्रीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. गंगाधर व्हसकोटी यांची, तर उपाध्यक्षपदी सर्जेराव झुरळे यांची निवड झाली. उत्तम येणेचवंडी, राजू गवळी, इराप्पा व्हसकोटी, आनंदा तपुरवाडी, कृष्णा कांबळे, झाकीर ताशिलदार, गीता खोत, सरिता बेळी, सुनीता कलगोंडा उपस्थित होते. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्‍यांचा सत्कार उत्तम येणेचवंडी यांच्या हस्ते केला.