मासिक ऋग्वेद बालनाट्य संमेलन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मासिक ऋग्वेद बालनाट्य संमेलन उत्साहात
मासिक ऋग्वेद बालनाट्य संमेलन उत्साहात

मासिक ऋग्वेद बालनाट्य संमेलन उत्साहात

sakal_logo
By

ajr171.jpg
89723
आजरा ः येथील बालनाट्य संमेलनात नाटककार गोविंद गोडबोले यांचा सत्कार डॉ. शिवशंकर उपासे यांनी केला. या वेळी डॉ. अनिल देशपांडे, संजय हळदीकर, सुभाष विभुते, आय. के. पाटील, सुनिल सुतार, डॉ. अंजली देशपांडे आदी उपस्थित होते.
---------------
मासिक ऋग्वेद बालनाट्य संमेलन उत्साहात
चैतन्य सृजनचा उपक्रम; आजऱ्यात नाटयतज्ञांचे मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १७ ः येथे मासिक ऋग्वेद बालनाट्य संमेलन उत्साहात झाले. चैतन्य सृजन व सेवा संस्थेतर्फे आयोजन केले होते. विविध शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. नाट्यतज्ज्ञ संजय हळदीकर संमेलनाध्यक्ष होते. नाटककार गोविंद गोडबोले प्रमुख उपस्थित होते.
श्री. हळदीकर व श्री. गोडबोले यांच्याहस्ते मासिक ऋग्वेदच्या बालनाट्य विशेषांकाचे प्रकाशन झाले. हळदीकर, गोडबोले यांचा सत्कार केला. डॉ. अनिल देशपांडे, आय. के. पाटील यांचा सत्कार झाला. संस्थेचे सचिव संतोष जाधव यांचा गौरव केला. नाट्यसंमेलनासाठी श्रीपाद मायदेव (मुंबई) यांनी आर्थिक मदत केली. याबाबत विजया मायदेव यांचा सत्कार झाला. नाटयतज्ज्ञ श्री. हळदीकर यांनी चाळीस विद्यार्थांचे पाचपट तयार करून त्यांना विविध विषयावरील नाट्यप्रसंग साकारण्याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. गोडबोले यांनीही वाक्याचे रुपांतर प्रभावीपणे कसे सादर करावे याबाबत मार्गदर्शन केले. आजरा हायस्कूलने राज्य पातळीवर सादर केलेल्या एकांकीकेच्या यशाबाबत मुख्याध्यापक शिवाजी येसणे, विजय पोतदार, संतोष कालेकर, तानाजी पाटील, सुरज पावले, भाग्यश्री पाटील, वेदिका पोतदार, किरण पाटील, आर्यन कांबळे यांचा सत्कार केला. डॉ. अनिल देशपांडे यांनी मुलांसाठी वह्या व खाऊची व्यवस्था केली. डॉ. देशपांडे, प्राचार्य डॉ. शिवशंकर उपासे, सुभाष विभुते, सुनील सुतार, रवींद्र देसाई, बळवंत शिंत्रे, डॉ. अंजनी देशपांडे, विनया मायदेव उपस्थित होते. सुभाष विभुते, स्नेहल शिंदे, संतोष जाधव, सुभाष पाटील, पुष्पलता घोळसे यांनी परिश्रम घेतले. मान्यवरांच्या हस्ते नटराज मुर्तीचे पुजन व दीपप्रज्वलन झाले. स्वागताध्यक्ष आय. के. पाटील यांनी आजऱ्यातील नाटयचळवळीचा आढावा घेतला. सुभाष विभुते यांनी प्रास्ताविकात त्यांनी मुलामुलींमध्ये नाटकाची जाणीव विकसीत व्हावी यासाठी संमेलन आयोजीत केल्याचे सांगीतले.