चित्र-शिल्प प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चित्र-शिल्प प्रदर्शन
चित्र-शिल्प प्रदर्शन

चित्र-शिल्प प्रदर्शन

sakal_logo
By

12383
कोल्हापूर : कलामंदिर महाविद्यालयात आयोजित चित्र-शिल्प प्रदर्शनात गणेशाच्या शिल्पाचे प्रात्यक्षिक सादर करताना शिल्पकार विशाल शिंदे.

कलामंदिर महाविद्यालयात
चित्र-शिल्प प्रदर्शन सुरू
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ : पापाची तिकटी येथील कुमावत सेवा संघ संचालित कलामंदिर महाविद्यालयात वार्षिक चित्र-शिल्प प्रदर्शनास आज सुरुवात झाली. ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते त्याचे उद्‍घाटन झाले. दरम्यान, रविवारपर्यंत (ता. १९) प्रदर्शन खुले राहील. या वेळी क्षीरसागर यांनी संस्थेतील अडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्‍वासन दिले.
संस्थेचे अध्यक्ष मारुतराव कातवरे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी प्रसिद्ध शिल्पकार विशाल शिंदे यांनी गणेशच्या शिल्पाचे प्रात्यक्षिक सादर केले. प्रदर्शनात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वर्षभर साकारलेल्या चित्रे व शिल्पांची मांडणी करण्यात आली आहेत. या वेळी संजय निगवेकर, प्राचार्य किशोर पुरेकर, डॉ. डी. डी. कुंभार, मोहन वडणगेकर, विजय कुंभार, राजेंद्र वागवेकर, रवींद्र वागवेकर, सतीश बाचणकर, सीताराम माजगावकर, शिवाजी वडणगेकर उपस्थित होते. मयूर कोळी व अनुजा शेटे यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी माजगावकर यांनी प्रास्ताविक केले. सिद्धी परीट यांनी आभार मानले.