जनावरे उपबाजार

जनावरे उपबाजार

कागल उपबाजाराला जनावरांची प्रतीक्षा
प्रतिसाद कमी; बाजार समिती करणार पुन्हा जोमाने प्रयत्न
शिवाजी यादव : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ : जिल्ह्यातील जनावरांचा खरेदी विक्री सहज सुलभ व्हावी, शेतकऱ्यांना दुभती जनावरे संगोपन शक्य व्हावे, दुग्ध व्यवसाय तेजीत येऊन आर्थिक उलाढाल वाढावी आदी उद्देशाने जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीने कागल येथे जनावरे उपबाजार सुरू केला. मात्र हा बाजार नावापुरता उरला आहे. अशा स्थितीत बाजार समितीने नव्याने सुविधा सक्षम करीत जनावरे बाजार पुन्हा जोमाने सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाने शेतकरी कुटुंबांना आधार दिला. त्यात आणखी भर पडून शेतकरी कुटुंबाच्या आर्थिकरणाला बळ मिळेल, त्यासाठी केवळ जिल्ह्यातील नव्हे तर परजिल्ह्यातील परराज्यातील जनावरांची खरेदी विक्री व्यवहार वाढण्याची गरज आहे. त्यासाठीच बाजार समिती जनावरे उपबाजार दर बुधवारी भरवला जातो. हा बाजार सुरू झाल्यानंतर पहिले तीन महिने दिवसाला तीनशेवर जनावरांची खरेदी विक्री होत होती. त्यानंतर कोरोनाकाळ सुरू झाला जवळपास दोन वर्षे जनावरे बाजार बंद राहिला. कोरोनाचे संकट दूर झाले जनावरे बाजार पुन्हा सुरू झाला, मात्र शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळणे कमी झाले. त्यामुळे बाजार कोलमडला आहे.
-----------------
चौकट
जनावरे बाजार घटण्याची कारणे
नोकरी, व्यवसायामुळे जनावरांना बाजारात घेऊन येणारे किंवा खरेदी करण्यास येणाऱ्यांचे प्रमाण घटले
जनावरे बाजार पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याची माहितीच गावागावांत पोहोचलेली नाही
लौकिक प्राप्त पारंपरिक गावातील बाजारातच जनावरे विक्रीसाठी नेण्याचीच अद्याप मानसिकता
व्यक्तिगत स्तरावर जनावरे खरेदी विक्रीचे व्यवहार गावा-गावांत वाढले
----------------
कागल उपबाजाराची उपयुक्तता अशी
पाचशेवर जनावरे बांधण्याची सोय
जनावरांसाठी निवारा शेड
बाजार समितीकडे व्यवहारांची अधिकृत नोंद होते
महामार्गा लगत बाजार असल्याने वाहतुकीचा खर्च कमी
जनावरांना चारा पाण्याची सोय सक्षम
-----------------
कोट
कागल उपबाजारात जनावरांसाठी शेड, शेतकऱ्यांसाठी निवारा, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह याशिवाय शंभरावर झाडे लावली आहेत. रात्रभर जनावरांना येथे ठेवता येते त्यासाठी विजेचे दिवे, सुरक्षा रक्षक आहेत. बाजार पेठेत जनावरे खरेदी विक्रीसाठी यावीत यासाठी बाजार समिती शेतकरी व कमीशन एजंट यांची बैठक घेऊन जागृती करीत आहे. येत्या महिन्याभरापासून प्रतिसाद वाढेल, अशी अपेक्षा आहे.
- जयवंत पाटील, सचिव, बाजार समिती, कोल्हापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com