सात लाख उत्तरपत्रिकांची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सात लाख उत्तरपत्रिकांची तपासणी
सात लाख उत्तरपत्रिकांची तपासणी

सात लाख उत्तरपत्रिकांची तपासणी

sakal_logo
By

आतापर्यंत सात लाख उत्तरपत्रिकांची तपासणी
शिक्षकांच्या बहिष्कारामुळे गती मंदावली; कोल्हापूर विभागातील चित्र
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ : कोल्हापूर विभागातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एकत्रित दहावी, बारावीच्या सुमारे सात लाख उत्तरपत्रिकांच्या तपासणीची प्रक्रिया आतापर्यंत पूर्ण झाली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बहिष्कार आंदोलन सुरू केल्याने या उत्तरपत्रिका तपासणीची गती काहीशी मंदावली आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून या परीक्षांमध्ये झालेल्या पेपरच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू झाले. त्यात मराठी, हिंदी, इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आदी विषयांच्या सुमारे सात लाख उत्तरपत्रिकांची तपासणी आतापर्यंत पूर्ण झाली आहे. ‘जुनी पेन्शन’च्या लढ्यात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी दहावी, बारावीच्या परीक्षांचे कामकाज ते करत आहेत. त्यामुळे दहावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू आहे. पण, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे या उत्तरपत्रिकांची तपासणीवर परिणाम झाला आहे.

चौकट
विद्यापीठात कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम
‘जुनी पेन्शन’च्या लढ्यात शिवाजी विद्यापीठ सेवक संघ सहभागी झाला आहे. या संघाच्या पदाधिकारी, सभासदांनी आज काळ्या फिती लावून काम केले. त्यांनी दुपारी २ वाजता विद्यापीठ इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारात निदर्शने केली. उद्या, शनिवारी काळ्या फिती लावून काम करतील. सोमवार (ता. २०) पासून बेमुदत कामबंद केले जाणार आहे.