
इचल ः डीकेटीईत व्याख्यानमाला
ich176
89763
इचलकरंजी ः डीकेटीईमध्ये व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. मनीषा भोजकर, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, प्र. संचालिका डॉ. एल. एस. आडमुठे आदी उपस्थित होते.
..................
जिद्द, इच्छाशक्तीच्या बळावर
कोणत्याही परिस्थितीवर मात
डॉ. मनीषा भोजकर; डीकेटीईमध्ये सत्यशोधक कृष्णाजी रामजी व्याख्यानमाला
इचलकरंजी, ता. १९ ः ‘मनात जिद्द, इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर स्त्री कोणत्याही परिस्थितीवर मात करीत आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकते,’ असे मत डॉ. मनीषा भोजकर यांनी व्यक्त केले. येथील डीकेटीई संस्थेमध्ये तक्रार समिती व शिवाजी विद्यापीठ यांच्या समन्वयाने महिलांसाठी सत्यशोधक कृष्णाजी रामजी व्याख्यानमाला झाली. यामध्ये पहिल्या व्याख्यानात त्या मार्गदर्शन करीत होत्या.
डॉ. भोजकर म्हणाल्या, ‘महिलांनी शोभेची बाहुली बनू नये. स्वत:च्या मेहनतीने स्वत:चे विश्व निर्माण करण्याचा सतत प्रयत्न करायला हवा. कोणाशीही तुलना करण्याचा प्रयत्न करू नये. परिस्थितीला दोष देत बसू नका. जगातील लाखो मुलींना अजूनही शिक्षणाची संधी मिळत नाही. त्यामुळे मिळालेल्या संधीचा फायदा घ्या. स्वत:ला पुरुषांपेक्षा कमी समजू नका.’
दुसऱ्या व्याख्यानात डॉ. नीलिमा लिमये यांनी `ताण आणि वेळ व्यवस्थापन` यावर मार्गदर्शन केले. तणावाची कारणे आणि त्यावर मात कशी करता येईल, याविषयी त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. तणाव आपल्याला नवी ऊर्जा आणि बदलण्याची प्रेरणा देतो. अशा परिस्थितीत शांतपणे मात करण्यासाठी योग्य कृती करा. समस्यांपेक्षा उपयांवर लक्ष केंद्रित करा.’
डॉ. भोजकर व डॉ. लिमये यांचे स्वागत केले. मानद सचिव डॉ. सपना आवाडे, प्रभारी संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे यांनी केले.
आरती गोखले, प्रेरणा शिंदे, शैर्या यादव, साक्षी दिवटे, ऐश्वर्या अरदाळे, निकिता कारव, ऐश्वर्या पाटील, अर्पिता देशपांडे, अस्मिता वंदारे, साक्षी शिंदे, कीर्ती अलाशे या विद्यार्थिनींनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. डॉ. अंजली पाटील यांनी संयोजन केले.