विश्‍वकर्मा योजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विश्‍वकर्मा योजना
विश्‍वकर्मा योजना

विश्‍वकर्मा योजना

sakal_logo
By

12385

‘पंतप्रधान विश्‍वकर्मा सन्मान’च्या
कार्यक्रमात शुभम सातपुते सहभागी

कोल्हापूर, ता. १७ : दिल्ली येथे आयोजित पंतप्रधान विश्‍वकर्मा सन्मान योजनेच्या कार्यक्रमात कोल्हापूरच्या शुभम अरुण सातपुते यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्‍व केले. कौन्सिल ऑफ लेदर एक्स्पोजतर्फे त्यांची निवड झाली होती. महाराष्ट्रातून निवड झालेल्या दोघांत त्यांचा समावेश होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पंतप्रधान विश्‍वकर्मा योजनेचा प्रारंभ झाला. मोदी यांनी वेबिनारद्वारे संबोधित केले. त्यासाठी महाराष्ट्रातून सातपुते यांची निवड झाली होती. देशातून निवडलेल्या आठ जणांच्या समितीत त्यांचा समावेश होता.
सातपुते यांनी कोल्हापुरी चप्पलला देश व जागतिक बाजारपेठेत वाव मिळविण्यासाठी योग्य सन्मान मिळाव्यात, अशा सूचना केल्या. तसेच त्यांनी बनवलेले कोल्हापुरी चप्प्पलाचा जोड मोदी यांना भेट म्हणून दिले. ते वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिवांकडे सुपूर्द केले.
सातपुते सुभाषनगर येथील रहिवासी आहेत. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण प्रायव्हेट इंग्लिश स्कूल, तर बारावीपर्यंतचे चाटे कॉलेजमधून झाले. त्यांनी विवेकानंद महाविद्यालयातून बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनची पदवी घेतली. त्यानंतर चेन्नईतील फूटवेअर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून एक वर्षांचा फुटवेअर कोर्स पूर्ण केला.