पाणी गळती पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी गळती पाहणी
पाणी गळती पाहणी

पाणी गळती पाहणी

sakal_logo
By

89786
कोल्हापूर : जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी ठिकठिकाणच्या गळती दुरुस्तीची पाहणी केली.

पाणीपुरवठ्याबाबत
दररोजचा अहवाल द्या
जलअभियंत्यांचे शाखा अभियंत्यांना आदेश
कोल्हापूर, ता. १७ : शहरात, तसेच उपनगरे, ग्रामीण भागात दररोज कमी दाबाने पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यासाठी जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी लहान-मोठ्या गळतींसाठी आज वितरण शाखेकडील अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. तसेच भागात पाहणी करून शाखा अभियंत्यांनी दररोज अहवाल देण्याची सूचनाही दिली.
शाखा अभियंता व सहायक अभियंता (यांत्रिकी) यांना सोबत घेऊन नवीन आपटेनगर पंपिंग, पुईखडी फिल्टर हाऊस, सासने कॉलनी, शाहू पार्क, यादवनगर, शिवाजी पेठ परिसरात पाहणी केली. जलअभियंता घाटगे यांनी शाखा अभियंत्यांना गळती तातडीने रोखण्यासाठी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच ज्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, अशा ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्याच्याही सूचना दिल्या. वितरण शाखेच्या अभियंत्यांनी कर्मचाऱ्यांच्या कामाचे नियोजन करून दररोजच्या कामाचा निपटारा करावा, असेही सांगितले. पाण्याचे नियोजन व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने सर्व शाखा अभियंत्यांनी भागात फिरती करून त्याचा दैनंदिन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी सहायक अभियंता (यांत्रिकी) जयेश जाधव, शाखा अभियंता मिलिंद पाटील, मिलिंद जाधव, प्रिया पाटील आदी उपस्थित होते.