महिला क्रिकेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला क्रिकेट
महिला क्रिकेट

महिला क्रिकेट

sakal_logo
By

89749
कोल्हापूर : महिला क्रिकेट स्पर्धेतील शहाजी कॉलेजच्या विजेत्या संघासह मान्यवर.

महिला क्रिकेट स्पर्धेत
शहाजी कॉलेज विजेता
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ क्रिकेट मैदानावर झालेल्या शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय महिला क्रिकेट स्पर्धेत श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या महिला संघाने विजेतेपदासह मनाचा वेणुताई चव्हाण चषक पटकावले. अटीतटीच्या अंतिम सामन्यात महावीर महाविद्यालयावर ४७ रणाने विजय मिळवला. तत्पूर्वी, झालेल्या उपांत्य सामन्यात के. डब्ल्यू. सी. कॉलेज, सांगली संघावर दहा विकेट राखून विजय मिळविला. या कामगिरीवर भुवनेश्‍वर, ओडिसा येथे सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत महाविद्यालयाच्या चार खेळाडूंची निवड शिवाजी विद्यापीठ संघात करण्यात आली. यामध्ये सोम्यलता बिराजदार, सानिका लाड, स्नेहा साळे, प्रज्ञा कांबळे यांचा समावेश आहे. विजेत्या संघास श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे, प्राचार्य डॉ. आर. के. शनिदेवान, जिमखाना प्रमुख डॉ. प्रशांत पाटील, प्रशिक्षक प्रा. सरदार पाटील, प्रा. प्रशांत मोटे यांचे मार्गदर्शन लाभले.