आप आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आप आंदोलन
आप आंदोलन

आप आंदोलन

sakal_logo
By

89790
कोल्हापूर : टिपरचालकांच्या किमान वेतनासाठी ‘आप’ने महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले.

किमान वेतनासाठी
‘आप’चा ठिय्या
कोल्हापूर, ता. १७ : कचरा उठाव करणाऱ्या टिपरचालकांच्या किमान वेतनासाठी आम आदमी पार्टीने महापालिकेसमोर सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन केले. महापालिकेसमोर ठिय्या मारून किमान वेतन अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी घोषणा देण्यात आल्या.
ठिय्या झाल्यानंतर प्रशासनासोबत बैठक झाली. ठेकेदारांची बिले काढण्याआधी पगारपत्रक तपासले जाईल, किमान वेतन दिले जाते का नाही हे पाहिले जाईल, किमान वेतन देत नाहीत त्यांचा ठेका रद्द केला जाईल, असे आश्‍वासन दिले. जुनी निविदा रद्द करून नवीन निविदा काढावी, निविदेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा ही मागणी उपायुक्त रविकांत आडसूळ यांच्याकडे लावून धरल्याने तोडगा निघाला नाही. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेतली. निविदेसाठीचा कार्यक्रम निश्चित करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिली जाईल, असे आश्‍वासन दिले. लेखी आश्‍वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.
सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, उत्तम पाटील, संजय साळोखे, उषा वडर, एस्तेर कांबळे, विजय हेगडे, दुष्यंत माने, विलास पंदारे, उमेश वडर, प्रसाद सुतार, समीर लतीफ, रणजित बुचडे, करण चौधरी, जयसिंग चौगुले आदी उपस्थित होते.