भाजपच्या माजी नगरसेवकाचा गोळ्या झाडून, दगड डोक्यात घालून खून

भाजपच्या माजी नगरसेवकाचा गोळ्या झाडून, दगड डोक्यात घालून खून

(सुधारित बातमी)

89802

जतला माजी नगरसेवकाचा
गोळ्या झाडून निर्घृण हत्या
---
भरदिवसा घटना; घटनेनंतर संशयित फरारी
जत, ता. १७ : मुलांना शाळेतून आणण्यासाठी गेलेल्या भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार झाला. बचावासाठी गाडी सोडून पळताना मागून गोळ्या झाडून व डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना येथे घडली. विजय शिवाजीराव ताड (वय ४०, रा. अल्फोन्सा स्कूलशेजारी, जत) असे मृताचे नाव असून, आज दुपारी साडेबाराच्या सुमारास शेगाव रस्त्यावरील अल्फोन्सा स्कूलशेजारीच घटना घडली. गेल्याच आठवड्यात कोसारी येथे दुहेरी हत्याकांड घडले होते. लगेचच शहरात भरदिवसा माजी नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या सर्व घटनेने शहरासह तालुका हादरून गेला आहे.
ही घटना कोणत्या कारणातून घडली. अज्ञात दोन संशयित कोण, याचा कसून शोध सुरू आहे. जत पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. सांगलीहून मागवलेल्या श्वानपथकाकडून पाहणी करण्यात आली. मात्र, श्वान काही अंतरावर जाऊन थांबले. ठसेतज्ज्ञांकडून घटनास्थळाचे ठसे घेण्यात आले. याशिवाय, तपासाची तीन पथके संशयितांच्या शोधात रवाना करण्यात आली आहेत.
घटनास्थळी व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की विजय ताड गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते. नुकताच त्यांचा कार्यकाळ संपला. आज दुपारी घराशेजारीच असणाऱ्या अल्फोन्सा स्कूलमधून मुलांना आणण्यासाठी चारचाकी (एमएच १०, सीएन२)मधून शेगावला जाणाऱ्या रस्त्यावरून निघाले होते. या वेळी दुचाकीवर दबा धरून बसलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळ्या झाडल्या. त्यात ते बचावले. त्यांनी गाडी तेथेच सोडून घराच्या दिशेने पळ काढला. मात्र, हल्लेखोरांनी पाठलाग करीत शाळेलगतच त्यांच्यावर मागून गोळ्या झाडल्या. त्यात ते जखमी होऊन जमिनीवर कोसळले. हल्लेखोरांनी शेजारीच पडलेला मोठा दगड घेऊन त्यांच्या डोक्यात घातला. यामुळे विजय ताड यांचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोरांनी दुचाकी घेऊन वन विभागाच्या हद्दीतून अकनहळ्ळी रस्त्याकडे पळ काढला. या ठिकाणी आपल्या मुलाला आणण्यासाठी आणखी एक पालक तथा पोलिस कर्मचारी जात असताना हल्लेखोरांना पळ काढताना पाहिले व त्यांचा पाठलाग केला. मात्र, ते पळून जाण्यात सफल ठरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com