रेल्वे बैठक

रेल्वे बैठक

लोगो- सकाळ बातमी परिणाम
-
89803, 89805

सह्याद्री एक्‍स्‍प्रेस लवकरच सुरू होणार
वरिष्ठ अधिकाऱ्यांची पुण्यात बैठक ः जादा डबे जोडण्यास मान्यता


कोल्हापूर, ता. १७ ः दीड वर्षापासून प्रतीक्षा असलेली कोल्हापूर सह्याद्री एक्स्पेस रेल्वे लवकरच सुरू करू, दिल्ली मुख्यालयाकडे तसा प्रस्ताव दिला असून मान्यता मिळताच ही रेल्वे सुरू होईल. त्यासोबत गाड्यांना जादा डबे जोडण्यात येतील, असे ठोस आश्वासन रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुणे येथे झालेल्या रेल्वेच्या पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्यांच्या बैठकीत दिली. ‘सकाळ’मधून ‘रेल्वेची कंजुषी एक्‍स्‍प्रेस’ या मालिकेतून मांडलेले अनेक मुद्दे प्रवासी संघटनांनी जोरदारपणे बैठकीत मांडले. त्याची दखल घेत रेल्वे अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
कोल्हापूरवरून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांना स्लिपरकोच व जनरलचे डबे कमी करून एसीचे डबे वाढवले आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांना स्लिपरमधून किंवा जनरलमधून जाण्यासाठी जागा मिळत नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय वाढल्याचे मुद्दे मालिकेतून मांडले होते. काही मार्गावर नवीन गाड्या सुरू करण्याची गरजही व्यक्त केली होती. रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनी याबैठकीत वरील मागण्या आग्रहाने मांडल्या.
कोल्हापूर ते कलबुर्गी सुपरफास्ट एक्‍स्‍प्रेस कोल्हापुरातून सकाळी सुरू करावी, कोल्हापूर निजामुद्दीन एक्‍स्‍प्रेसला व कोल्हापूर-अहमदाबाद एक्‍स्‍प्रेस या गाड्याने प्रत्येकी तीन ज्यादा डबे जोडावेत, कोल्हापूर-मुंबई-कोयना एक्‍स्‍प्रेसला गाडीत तीन जनरल डबे व कोल्हापूर-कलबुर्गी सुपरफास्ट एक्‍स्‍प्रेसला दोन स्लीपर डबे व दोन एसी थ्री टायर डबे जोडावेत. कोल्हापूर-नागपूर एक्‍स्‍प्रेसला एक ज्यादा डबा जोडावा, अशा मागण्या सदस्यांनी केल्या. त्याला रेल्‍वे अधिकाऱ्यांनी मान्यता दिली.
कोल्हापूर, हातकणंगले, मिरज, सांगली, सातारा या स्थानकांचा ‘अमृतभारत’ योजनेखाली नवीनीकरण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी प्रवाशांकडून ३१ मार्चअखेरपर्यंत सूचना मागवल्या आहेत. कोल्हापूर-अहमदाबाद एक्‍स्‍प्रेसला कऱ्हाड येथे थांबा देण्याचेही मान्य केले.
रेल्वे प्रबंधक इंदु दुबे, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ वाहतूक प्रबंधक डॉ. स्वप्नील निला व वरिष्ठ अधिकारी, रेल्वे सल्लागार समितीचे किशोर भोरावत, शिवनाथ बियाणी, श्रीनिवास शर्मा, ॲड. विनित पाटील, तानाजी कराळे, बशीर सुतार उपस्थित होते.

चौकट
नवीन स्वच्छतागृह प्रवाशांसाठी खुले
कोल्हापूर रेल्वे स्थानकावरील विविध गैरसोयींकडे ‘सकाळ’च्या मालिकेतून लक्ष वेधले होते. त्याचीही दखल घेत आजपासून रेल्वे स्थानकावरील नवीन स्वच्छतागृह प्रवाशांसाठी खुले करण्यात आले. तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्याचेही काम सुरू झाले. दोन दिवसांत ही सुविधा सुरू होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com