Tue, June 6, 2023

निवडणूक सुनावणी
निवडणूक सुनावणी
Published on : 17 March 2023, 4:09 am
स्थानिक स्वराज्य संस्था
निवडणूक सुनावणी मंगळवारी
कोल्हापूरः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी २१ मार्चला आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीमुळे लांबलेली सुनावणी त्यादिवशी तरी होणार का याची उत्सुकता लागून राहिली आहे. १४ मार्चला ठेवलेली सुनावणी न होताच पुढील तारीख दिली होती. सत्तासंघर्षाची सुनावणी संपल्यानंतर २१ मार्चला सुनावणी होईल, असे सांगण्यात आले. त्यादिवशी काय होणार यावर निवडणुकांचे भवितव्य ठरणार आहे. पावसाळ्यात निवडणूक होणार की दिवाळीपर्यंत रखडणार हे सुनावणीनंतरच निश्चित होईल. दरम्यान, जिल्हा परिषद, नगरपालिकांवरील प्रशासकांचा कालावधी वाढवण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे निवडणूक केव्हा होतील, याची उत्सुकता साऱ्यांना लागली आहे.