मुंबई, नागपूर, पुणे, 
नांदेड संघ विजयी

मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड संघ विजयी

लोगो -आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरु चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा
मुंबई, नागपूर, पुणे,
नांदेड संघ विजयी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः शिवाजी विद्यापीठातील महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरु चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत आज पाचव्या दिवशी मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड विद्यापीठांच्या संघांनी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळविला.
आजच्या पहिल्या सामन्यात मुंबई विद्यापीठाने जळगावच्या कवयित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठावर ७ गडी राखून विजय मिळविला. जळगावने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. १८.३ षटकात सर्व बाद ११६ धावा ते करू शकले. मुंबई विद्यापीठाने ९.४ षटकात ३ गडी गमावून १२० धावा केल्या. मुंबईचे संजय पवार सामनावीर ठरले. दुसऱ्या सामन्यात नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाने सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठावर सहा गडी राखून मात केली. सोलापूरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. त्यांनी २० षटकात ९ बाद १४३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल नागपूरने १९ षटकात ४ बाद १४६ धावा केल्या. संदीप रिंघे सामनावीर ठरले. दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शिवाजी विद्यापीठ-ब संघाला ८८ धावांनी पराभूत केले. पुणे विद्यापीठाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. त्यांनी २० षटकात ५ बाद १७९ धावा केल्या. शिवाजी विद्यापीठाचा संघ १५.३ षटकात ९१ धावाच करू शकला. मनिष गायकवाड सामनावीर ठरले. दुसऱ्या सामन्यात नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठावर परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठावर ६५ धावांनी विजय मिळविला. परभणीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. प्रथम फलंदाजी करताना नांदेडने १० षटकात ५ बाद १८७ धावा केल्या. परभणी संघाला प्रत्युत्तरादाखल खेळताना २० षटकात १० बाद १२२ धावा करता आल्या. पी.एम. मुपडे सामनावीर ठरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com