
आ. का. १८ मार्च
आजचे कार्यक्रम- १८ मार्च
.............................
० गुरू-शिष्य प्रदर्शन ः रेखासम्राट टी. के. वडणगेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरू-शिष्य प्रदर्शन. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन. वेळ ः सकाळी दहा ते रात्री साडेआठ
० कलामंदिर वार्षिक प्रदर्शन ः कलामंदिर महाविद्यालयाच्या वार्षिक प्रदर्शनात पॉटरीची प्रात्यक्षिके. स्थळ ः पापाची तिकटी, वेळ ः सकाळी दहा ते दुपारी बारा
० स्त्री समता कायदा मेळावा ः भारतीय कम्युनिस्ट पक्षासह विविध पक्ष व संघटनांतर्फे स्त्री समता कायदा मेळावा. स्थळ ः श्रमिक हॉल, लक्ष्मीपुरी. वेळ ः दुपारी दोन
० व्याख्यान ः भाई दाजिबा देसाई व्याख्यानमालेंतर्गत प्रा. डॉ. भारतभूषण माळी यांचे व्याख्यान. स्थळ ः शेतकरी कामगार पक्ष हॉल, टेंबे रोड. वेळ ः सायंकाळी पाच
० स्वामी समर्थ उत्सव ः श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळातर्फे प्रकट दिन उत्सवांतर्गत भावभक्तीगीत कार्यक्रम. स्थळ ः प्रज्ञापुरी, रुईकर कॉलनी. वेळ ः सायंकाळी सात
० स्वामी समर्थ उत्सव ः श्री स्वामी समर्थ भजनी मंडळातर्फे प्रकट दिन उत्सवांतर्गत स्वामी समर्थ भजनी मंडळ (वडणगे) कार्यक्रम. स्थळ ः संभाजीनगर मगरमठी. वेळ ः रात्री आठ