पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

ट्रॅव्हल बॅगसह ५८ हजारांचा मुद्देमाल चोरीस
कोल्हापूर ः हिम्मतबहाद्दूर कॉलनीतील स्नेहल अपार्टमेंटमध्ये ट्रॅव्हल बॅगसह सुमारे ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. १० ते १३ मार्च दरम्यान ही चोरी झाली आहे. याची फिर्याद श्रीनिवास सदानंद चव्हाण यांनी काल शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बॅगेतील लॉपटॉप, स्मार्ट वॉच, शाळा-महाविद्यालयातील कागदपत्रे असा सुमारे ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने पळविला आहे. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
---
एकास तीन दिवस पोलिस कोठडी
कोल्हापूर ः बोंद्रेनगर येथील संशयित आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मारुती बोडेकर असे त्याचे नाव आहे. बोंद्रेनगर परिसरातील मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात त्याला करवीर पोलिसांनी अटक केली आहे. अद्याप त्याच्या आई-वडिलांना अटक केलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
--------
बापट कॅम्प परिसरात एकाची आत्महत्या
कोल्हापूर ः बापट कॅम्प परिसरात एकाने विषारी द्रव घेऊन आत्महत्या केली. बापू बाळू पाटील (वय ५३, रा. संत गोरा कुंभार वसाहत) असे त्यांचे नाव आहे. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली. पोलिसांनी सांगितले, की बापू यांनी आज दुपारी राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले. याची माहिती मिळताच त्यांना तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com