आता प्रमुख पाहुण्यांच्या होकाराची प्रतिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आता प्रमुख पाहुण्यांच्या होकाराची प्रतिक्षा
आता प्रमुख पाहुण्यांच्या होकाराची प्रतिक्षा

आता प्रमुख पाहुण्यांच्या होकाराची प्रतिक्षा

sakal_logo
By

आता प्रमुख पाहुण्यांच्या होकाराची प्रतीक्षा
दीक्षांत समारंभ; शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडून पत्रव्यवहार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः शिवाजी विद्यापीठाचा ५९ वा दीक्षांत समारंभ २९ मार्चला घेण्यास राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्याकडून मान्यता मिळाली आहे. या समारंभाची तारीख यापूर्वी निश्चित झालेले प्रमुख पाहुणे इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशनचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांना विद्यापीठ प्रशासनाने पत्राद्वारे कळविली आहे. आता त्यांच्या उपस्थितीबाबतच्या होकाराची प्रशासनाला प्रतीक्षा लागली आहे.
विद्यापीठाने १६ फेबुवारीला दीक्षान्त समारंभ घेण्याचे निश्‍चित केले होते. त्यासाठी इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशनचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे हे प्रमुख पाहुणे म्हणून ठरले. मात्र, तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी अचानकपणे त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने काही अपरिहार्य कारणास्तव दीक्षांत समारंभ स्थगित करण्याचा निर्णय १३ फेब्रुवारीला जाहीर केला. त्यानंतर दीक्षांत समारंभ २९ मार्चला घेण्यास राज्यपाल बैस यांनी मान्यता दिली आहे. आता त्याबाबत डॉ. सहस्त्रबुद्धे यांना कळविले आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप कोणतेही उत्तर विद्यापीठ प्रशासनाला मिळालेले नाही. त्यांनी या समारंभाला उपस्थित राहण्याबाबत होकार दिला, तर ठीक आहे. अन्यथा विद्यापीठाला पुन्हा नवीन पाहुणे शोधावे लागणार आहेत.