महात्मा गांधींच्या विचारभूमीतून लोकनेते देसाई यांचे नेतृत्व फुलले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महात्मा गांधींच्या विचारभूमीतून लोकनेते देसाई यांचे नेतृत्व फुलले
महात्मा गांधींच्या विचारभूमीतून लोकनेते देसाई यांचे नेतृत्व फुलले

महात्मा गांधींच्या विचारभूमीतून लोकनेते देसाई यांचे नेतृत्व फुलले

sakal_logo
By

89817
...............

बाळासाहेब देसाईंचे राज्याच्या
विकासात महत्त्वाचे योगदान

डॉ. राजन गवस; शिवाजी विद्यापीठातर्फे व्याख्यान


कोल्हापूर, ता. १८ ः'' लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नेतृत्वविकासामध्ये महात्मा गांधीजी यांच्या विचारांच्या भूमीचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्राचे एक नवीन बदलते सर्वंकष स्वरुप निर्माण करण्यामध्ये त्यांची भूमिका आणि योगदान महत्त्वाचे राहिले’, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनामार्फत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयंतीनिमित्त येथील राजर्षी शाहू स्मारक भवनात आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाश पवार होते. डॉ. गवस यांनी व्याख्यानात यशवंतराव चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई, वसंतदादा पाटील यांची वैचारिक परंपरा आणि त्यामागील प्रेरणादायी इतिहास सांगितला.
ते म्हणाले, ‘जनमानसामध्ये या लोकनेत्यांविषयी अढळ श्रद्धा होती. पाटणसारख्या डोंगरी भागातून कोल्हापूरला येऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अगदी तळागाळातून वर आलेले नेतृत्व म्हणजे लोकनेते बाळासाहेब देसाई होय. रस्ते, सिंचन, शिक्षण इत्यादी सुविधा संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविण्याचे कार्य त्यांनी केले. महात्मा गांधीजींची नैतिकता आणि चारित्र्य, लोकांसाठी जगणे यातून बाळासाहेब देसाई यांचे नेतृत्व विकसित झाले. त्यांच्या नेतृत्वाला गांधीजींच्या विचारांची भूमी आणि खेड्यातील अनुभवांची जोड आहे. आपले मंत्रीपद हे सर्वसामान्य लोकांचे आहे, याची जाणीव बाळगून त्यांनी कार्य केले.’ इतिहास विभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी प्रास्ताविकात अध्यासनाच्या कार्याचा आणि उपक्रमांचा आढावा घेतला. डॉ. दत्तात्रय मचाले यांनी आभार मानले.
...........

सर्वांगीण विकासासाठी
मंत्रीपदाचा उपयोग

अध्यक्षीय मनोगतात डॉ. प्रकाश पवार म्हणाले, ‘लोकनेते बाळासाहेब देसाई हे नितीमान आणि चारित्र्यवान असे महाराष्ट्राला लाभलेले नेतृत्व होते. त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या मंत्रीपदाचा उपयोग केला.’