
इंटिरियर डिझाईनसतर्फे प्रदर्शन
इंटिरियर डिझायनिंग उत्कृष्ट
साहित्य प्रदर्शन ७ एप्रिलपासून
कोल्हापूर, ता. १९ : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझाईनर्स (आय.आय.आय.डी.) ही संस्था ५० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्त संस्थेच्या कोल्हापूर विभागातर्फे ७ ते १० एप्रिलअखेर हॉटेल पॅव्हेलियनमध्ये इंटिरियर डिझायनिंगच्या उत्कृष्ट साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष चंदन मिरजकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मिरजकर म्हणाले, ‘भारतातील अनेक नामवंत कंपन्या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. ख्यातनाम वास्तुविशारद दीपेन गाडा, हबीब खान, प्रताप जाधव तसेच सांगली, सातारा, कऱ्हाड, बेळगाव, गोवा, उत्तर कर्नाटक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी भागातून अनेक इंटिरियर डिझायनर उपस्थित राहणार आहेत. यावेळी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्याने होतील. उत्तमोत्तम सजावट साहित्य एकाच छताखाली पाहण्याची संधी आहे. आर्किटेक्ट सुनील पाटील, आर्किटेक्ट शिरीष बेरी यांचा विशेष सत्कार या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.’
७ एप्रिलला दुपारी चार वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. यानंतर ८ ते १० एप्रिल या कालावधीत प्रदर्शन असेल. यानिमित्त २ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता बाईक रॅलीचे आयोजन केले आहे. रॅली छत्रपती ताराराणी चौक ते शहरातील मुख्य रस्तामार्गे हॉटेल पॅव्हेलियन या मार्गाने होईल.’
सचिव गौरव काकडे, उपाध्यक्ष शरद पवार, खजिनदार किशोर पाटील, संचालक अभिजित चव्हाण, यशोराज मोहिते उपस्थित होते.