अष्टविनायक स्टुडिओ वेबसाईट अनावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अष्टविनायक स्टुडिओ वेबसाईट अनावरण
अष्टविनायक स्टुडिओ वेबसाईट अनावरण

अष्टविनायक स्टुडिओ वेबसाईट अनावरण

sakal_logo
By

89892
कोल्हापूर : अष्टविनायक स्टुडिओत व्हीएफएक्स अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण झाले. या वेळी संग्राम पाटील, शिरीष जाधव आदी.

व्हीएफएक्स तंत्रज्ञानातून
उत्तम करिअरची संधी
---
आमदार ऋतुराज पाटील; अष्टविनायक स्टुडिओच्या वेबसाईटचे अनावरण
कोल्हापूर, ता. १८ : व्हीएफएक्स तंत्रज्ञान ही काळाची गरज असून, हे तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांनी चित्रपटसृष्टीशी सबंधित उत्तम करिअर घडवावे, असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. अयोध्या टॉवर्स येथील अष्टविनायक स्टुडिओमधील नवीन वेबसाईटचे अनावरण आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
संग्राम पाटील यांनी स्टेशन रोडवरील दाभोळकर कॉर्नर परिसरातील अयोध्या टॉवर्समध्ये अष्टविनायक मीडिया ॲण्ड एन्टरटेन्मेंट ही शैक्षणिक संस्था २००९ मध्ये सुरू केली आहे. येथे इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म ॲण्ड ॲडव्हान्स सिनेमॅटिक्स हे चित्रपटासाठी आवश्यक ॲनिमेशन आणि ‘व्हीएफएक्स’चे शिक्षण दिले जाते, असे पाटील यांनी सांगितले. दहावी आणि बारावी परीक्षा संपलेल्या विद्यार्थ्यांना व्हीएफएक्स कोर्स इतर शिक्षणाबरोबर पूर्ण करता येऊ शकतो. हे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चित्रपटसृष्टीत तंत्रज्ञ म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले. या वेळी शिरीष जाधव, रमीझ मणेर, विनायक कुंबराळकर उपस्थित होते.