शिक्षक पदे भरा- सतेज पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक पदे भरा- सतेज पाटील
शिक्षक पदे भरा- सतेज पाटील

शिक्षक पदे भरा- सतेज पाटील

sakal_logo
By

लोगो
...

शिक्षक, शिक्षकेतर
कर्मचाऱ्यांची रिक्तपदे तातडीने भरा

आमदार सतेज पाटील यांची विधानपरिषदेत मागणी


कोल्हापूर, ता. १८ ः राज्यात शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांमध्ये शिक्षकांची दहा टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त ठेवू नयेत, असा नियम आहे. मात्र, बहुतांश शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांची ६७ हजार ७५५ पदे रिक्त असून, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याची रिक्तपदे तातडीने भरावीत, अशी मागणी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केली. त्यावर उत्तर देताना, लवकरच शिक्षकांची ३० हजार पदे भरण्याचा मानस असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले.
शालेय शिक्षण विभागांतर्गत उच्च माध्यमिक स्तरावरील (१० + २) माहिती तंत्रज्ञान विषयासाठी नियुक्त मान्यताप्राप्त शिक्षकांना मानधनाऐवजी वेतन अनुदान मंजूर करावे, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली. याबाबत अनुदान देण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला असून, तो शासनाच्या विचाराधीन असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.
...

‘एसटी’बाबतही प्रश्न

एसटी महामंडळाचे प्रतिदिन उत्पन्न १३ कोटी ५० लाख असून, खर्च २५ कोटी आहे. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक असल्याने महामंडळ तोट्यात आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, सर्व मार्गांवर वाहतूक वाढविण्याचे तसेच बसची संख्या वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वेतनासाठी राज्य शासन काही प्रमाणात अर्थसहाय्य उपलब्ध करून देत आहे, अशी माहिती दिली.