‘ओंकार’च्या क्रीडा महोत्सवाला प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ओंकार’च्या क्रीडा महोत्सवाला प्रारंभ
‘ओंकार’च्या क्रीडा महोत्सवाला प्रारंभ

‘ओंकार’च्या क्रीडा महोत्सवाला प्रारंभ

sakal_logo
By

‘ओंकार’च्या क्रीडा महोत्सवाला प्रारंभ
गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सवाला प्रारंभ झाला. उत्तूरचे सरपंच किरण आमणगी यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्‍घाटन झाले. प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण अध्यक्षस्थानी होते. डॉ. हणमंत शिरगुपे, संचालक विठ्ठल भमानगोळ यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांनी स्वागत केले. शारीरिक शिक्षण संचालक सुरेश धुरे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र कुंभार यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिली. गंगासागर चोले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. भीमराव शिंदे यांनी आभार मानले. दरम्यान, क्रीडा महोत्सवात कबड्डी, धावणे, लांब उडी, गोळाफेक, थाळीफेक, रस्सीखेच, शरीरसौष्‍ठव, सूर्यनमस्कार स्पर्धा होणार आहेत.