
लोहिया कॉलेजमध्ये पारितोषिक वितरण
89955
कोल्हापूर : लोहिया कॉलेजतर्फे वार्षिक पारितोषिक वितरणप्रसंगी उपस्थित मान्यवर.
लोहिया कॉलेजतर्फे वार्षिक पारितोषिक वितरण
कोल्हापूर : ‘विद्यार्थ्यांनी १२ वीचे शिक्षण पुर्ण होण्यापूवी कल चाचणी करून भावी करिअर निवडावे,’’ असे विभागिय शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी सांगितले. दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे सौ. स. म. लोहिया ज्युनिअर कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक कार्यक्रम झाला.
सहाय्यक संचालक सुभाष चौगले, दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे सल्लागार विनोदकुमार लोहीया यांनी मार्गदशन केले. गव्हर्निंग कौन्सिलचे उपाध्यक्ष नितिन वाडीकर, नेमचंदजी संघवी, गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य प्रशांत लोहिया, सचिव प्रभाकर हेरवाडे, ‘व्हाईट आर्मी’चे अशोक रोकडे, किमान कौशल्य विभाग प्रमुख प्रा. सुनील कांबळे उपस्थित होते.
कॉलेजच्या कला, क्रिडा, सांस्कृतिक प्रगतीचा आढावा प्राचार्य एस. एस. चव्हाण यांनी घेतला. प्रा. भावना कलंगे-पवार, प्रा. अर्चना चिकोडे यांनी परिचय करुन दिला. उपप्राचार्य अनिल सुर्यवंशी यांनी आभार मानले.