
तरुणाचा मृत्यू
फोटो आहे. 89990
तणनाशक पोटात
गेल्याने तरुणाचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः दाताने बाटलीचे टोपण काढताना तणनाशक पोटात गेल्याने शेतकरी तरुणाचा उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला. आदित्य तानाजी धनगर (वय १७, रा. कोथळी, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे. त्याच्या मागे आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.
पोलिसांनी सांगितले की, आदित्य शेतीकाम करत होता. तीन दिवसांपूर्वी शेतात तणनाशक फवारणीसाठी गेला होता. तणनाशकाच्या बाटलीचे टोपण हाताने निघाले नसल्याने त्याने दाताने काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तणनाशक त्याच्या पोटात गेल्याने त्याला उलट्यांचा त्रास झाला. खासगी रुग्णालयातील उपचारानंतर नातेवाइकांनी काल त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना आज त्याचा मृत्यू झाला.
..........................