Tue, June 6, 2023

पाणीपुरवठा बंद
पाणीपुरवठा बंद
Published on : 18 March 2023, 4:44 am
शहरातील अनेक भागात
आज पाणीपुरवठा बंद
कोल्हापूर : उच्चदाब वाहिनीच्या कामासाठी उद्या (ता. १९) बालिंगा जल उपसा केंद्राचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे बालिंगा व नागदेववाडी उपसा केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यावर अवलंबून असणाऱ्या शहरातील पाचही वॉर्डमधील अनेक भागात पाणीपुरवठा होणार नाही. सोमवारीही (ता. २०) अपुरा व कमी दाबाने होईल. ए व बी सी आणि डी वॉर्डातील शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा होणार नसून पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.