हद्दपार पाथरवट स्थानबद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हद्दपार पाथरवट स्थानबद्ध
हद्दपार पाथरवट स्थानबद्ध

हद्दपार पाथरवट स्थानबद्ध

sakal_logo
By

फोटो आहे.
...

सराईत गुन्हेगार अजय पाथरवटला
वर्षासाठी कळंबा कारागृहात स्थानबद्ध

राजारामपुरी पोलिसांची कारवाई - जिल्हाधिकारी यांचे आदेश, रेकॉर्डवर १५ हून अधिक गुन्हे दाखल


कोल्‍हापूर, ता.१८ ः राजारामपुरी, दौलतनगरसह उपनगरात सार्वजनिक सुव्यवस्थेत वारंवार बाधा आणणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. अजय अनिल पाथरवट (वय २३, रा. सायबर चौक, दौलतनगर परिसर, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिलेल्या आदेशानुसार राजारामपुरी पोलिसांनी त्याला कळंबा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी सांगितले की, समाजातील शांतता भंग करणाऱ्या समाजकंटक गुंडांसह अवैध व्यवसायिक टोळ्या यांचे समूळ उच्छाटन व्हावे व सर्व सामान्यांचे दैनंदिन जीवन सुरळीत व्हावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकारी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले होते. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी राजारामपुरी, दौलतनगरसह उपनगरात गंभीर गुन्ह्यात सक्रीय असलेल्या अजय पाथरवट याच्या विरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी प्रव्यविषयक गुन्हेगारी, तसेच धोकादायक व्यक्ती विधात कृत्यास आळा घालण्यासाठी अधिनियम १९८१ म्हणजे एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेजरस ॲक्टिव्हीटी) नुसार ही कारवाई करण्याचा प्रस्ताव उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्याकडे सादर केला होता.
-----------------
पाथरवटविरुद्ध पंधरा गुन्हे दाखल

अजय पाथरवट याच्याविरुद्ध राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण पंधरा गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये
सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्थेत बाधा आणणे, जबरी चोरी, घरात घुसून खंडणीची मागणी करणे, मारामारी, प्राणघातक हल्ला, विनयभंग, जाळपोळ, लहान बालकांवरील लैगिंक अत्याचार, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, शिवीगीळ आणि दमदाटी करणाऱ्या गुन्ह्यांचा समावेश आहे. तसेच त्याला यापूर्वीही त्याला एकदा हद्दपार केले होते.
-----------
‘एमपीडीए’चा प्रस्ताव
दहशतीमुळे पाथरवटवर अनेक गुन्हे दाखल झाले नसल्याचेही पोलिसांना दिसून आले. त्यामुळे पाथरवट वर ‘एमपीडीए’चा प्रस्ताव दिला होता. याची छाननी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी करून पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची मान्यता घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी रेखावार यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. त्यांनी १५ मार्चपासून सराईत गुन्हेगार अजय पाथरवट याला प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचे आदेश दिले. त्यानुसार राजारामपुरी पोलिसांनी त्याची अंमलबजाणी करून त्याला कळंबा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केल्याची माहिती निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली.