हरळी शाळेत देणगीदारांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हरळी शाळेत देणगीदारांचा सत्कार
हरळी शाळेत देणगीदारांचा सत्कार

हरळी शाळेत देणगीदारांचा सत्कार

sakal_logo
By

89996
हरळी बुद्रूक : प्राथमिक शाळेत देणगीदारांच्या सत्कारप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व शिक्षक.

हरळी शाळेत देणगीदारांचा सत्कार
गडहिंग्लज, ता. १९ : हरळी बुद्रूक (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक शाळेत देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. शिक्षण विस्तार अधिकारी आर. आर. कोरवी, जॉन्सन कंट्रोल्स कंपनीचे किरण पवार, आवाहन फाउंडेशनचे ब्रजकिशोर प्रधान यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राथमिक शाळेला जॉन्सन कंट्रोल्स व आवाहनतर्फे चार लाख ६५ हजार रुपयांचे साहित्य दिले आहे. शाळेचे माजी विद्यार्थी रिजनल ऑपरेशन मॅनेजर प्रकाश गुरव यांच्या प्रयत्नातून हे साहित्य उपलब्ध झाले आहे. पंचायत समितीच्या माजी सभापती रुपाली कांबळे यांनी आपल्या फंडातून एक लाख रुपये दिले आहेत. माजी सभापती हिंदुराव नौकुडकर यांनी रंगरंगोटीसाठी ११ हजारांची देणगी दिली आहे. निवृत्त कॅप्टन राजाराम शिंदे यांनी १० हजार रुपये देणगी दिली आहे. त्यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. सरपंच नीलम कांबळे, उपसरपंच बाजीराव गोरुले, केंद्र समन्वयक अनिल बागडी, ग्रामसेवक सुरेश गुरव, पोलिस पाटील, रेणुका परीट, माजी मुख्याध्यापिका नंदा तिबिले यांच्यासह ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक उपस्थित होते. मुख्याध्यापिका शुभांगी कुंभार यांनी प्रास्ताविक केले. पद्मजा काकडे यांनी सूत्रसंचालन केले. विजय कुंभार यांनी आभार मानले. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील वंजारे, उपाध्यक्षा प्रियांका गुरव, अकल्पिता बांदेकर, सविता पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.