शिवराज नाईकवाडे आगे बढो, हम तुम्हारे साथ है | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवराज नाईकवाडे आगे बढो, हम तुम्हारे साथ है
शिवराज नाईकवाडे आगे बढो, हम तुम्हारे साथ है

शिवराज नाईकवाडे आगे बढो, हम तुम्हारे साथ है

sakal_logo
By

90018
...

नाईकवाडे यांना सचिवपदावरून
हटवल्याबद्दल पालकमंत्र्याना घेराव

विविध संघटनांकडून

कोल्हापूर, ता. १९ ः पश्चिम महाराष्‍ट्र देवस्थान समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शिवराज नाईकवाडे यांच्याकडून सचिवपदाचा कार्यभार काढून घेतल्यानंतर आज विविध संघटनांनी पालकमंत्री दिपक केसरकर यांना मंदिर परिसरात घेराव घातला.''शिवराज नाईकवाडे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा देत त्यांच्याकडे देवस्थान समितीच्या सचिवपदाची जबाबदारी पुन्हा द्यावी, अशी जोरदार मागणीही यावेळी केली. कोल्हापूरची शाहूप्रेमी जनता, सेवाव्रत प्रतिष्ठान व मावळा ग्रुप या संघटनांनी नाईकवाडे यांच्या समर्थनाचे निवेदन पालकमंत्र्यांकडे सादर केले.
निवेदनात म्हटले आहे, देवस्थान समितीच्या सचिवपदावर काम करताना नाईकवाडे यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. मंदिरातील भ्रष्टाचार उघडकीस आणला, दिखाव्याच्या फरशा काढून मंदिराला गतवैभव प्राप्त करून दिले. मणिकर्णिका कुंडाची स्वच्छता, नगरप्रदक्षिणेचा रथ सागवानी करून घेतला. बिनखांबी मंदिर मूळ स्वरूपात आणले. मंदिरातील दर्शन व्यवस्थेचे सुयोग्य नियोजन केले, देवीच्या साड्यांचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले, मंदिरातील पुरातन झुंबर खुले केले, टेंडर प्रक्रिया बंद करून देवस्थान सेवा योजनेतून सेवा प्रक्रिया चालू केली. पितळी उंबऱ्यावरील सागवानी दरवाजा देवस्थान सेवा योजनेतून विनाखर्च बसविला. अशी कामे केल्यानंतरही त्यांना तडकाफडकी पदावरून का काढून टाकले, असा जाबही कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्याना विचारला. यावेळी जयकुमार शिंदे, किसनराव कल्याणकर, उमेश पोवार, बबन रानगे, निलेश सुतार, अनिल शिंदे, किरण नकाते, अमित आडके, रमाकांत बिरंजे, सर्जेराव देवणे, बाबूराव शेळके, संदीप रानगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
--------

‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंतर्गत येणाऱ्या मंदिराच्या जमिनीबाबतचा महसुली प्रश्न सोडविण्यासाठी नव्या सचिवांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर येथील महसुली काम करणारा अधिकारी नेमावा लागणार होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. महसुली प्रश्न सुटल्यानंतर पुर्वीच्या सचिवांकडे पुन्हा कार्यभार सोपविण्यात येईल. त्यांच्या पदमुक्तीबाबत कोणताही गैरसमज नको. मंदिरातील विकासकामांची सुरूवात करण्यात येणार आहे. त्यामुळे मंदिर आवारात कॅमेराबंदी करण्यात आली आहे. विकासकामे पूर्ण झाल्यानंतर कॅमेरावरील बंदी उठविण्यात येईल.
- पालकमंत्री दिपक केसरकर