चिमणी दिन विशेष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिमणी दिन विशेष
चिमणी दिन विशेष

चिमणी दिन विशेष

sakal_logo
By

लोगो- चिमणी दिन विशेष
-
चिमणीचा कटआऊट वापरणे
........................


चिमण्यांचा वाढला चिवचिवाट
‘सकाळ’ची ‘चला, चिमण्या वाचवूया’ मोहीम लोकांनीच घेतली हाती

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ : विविध जनजागृतीपर उपक्रम आणि कृती कार्यक्रमांमुळे चिमण्यांचा किलबिलाट वाढला असून, चिमणी आणि एकूणच पक्ष्यांबाबत जागरूकता वाढली आहे. विविध प्रयत्नांनंतर अंगणात आलेल्या चिमण्या पुन्हा माघारी परतू नयेत, यासाठी लोकांनीच आता ‘सकाळ’ने सुरू केलेली ‘चला, चिमण्या वाचवू या’ ही मोहीम हाती घेतली आहे.
दरम्यान, चिमण्या आणि इतर पक्ष्यांच्या अधिवासाबरोबरच उन्हाळ्यात त्यांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी विविध संकल्पना यशस्वी होत आहेत.

दृष्टिक्षेपात मोहीम

-‘सकाळ’ने २० मार्च २०१२ ला ‘चला, चिमण्या वाचवू या’ अशी साद कोल्हापूरकरांना घातली
-‘सकाळ’च्या पुढाकारांनी लोकांना चिमण्यांच्या घरट्यांचे वाटप झाले.
- खास पक्ष्यांसाठी म्हणून कुंभार गल्लीमध्ये जलपात्रे तयार होऊ लागली.
- चिमण्यासह इतर पक्ष्यांच्या जतन व संवर्धनासाठी विविध माहितीपट व लघुपट दाखवले.
- २०१६ पासून लोकसहभागातूनच जलपात्रे, घरट्यांची निर्मिती व वितरणालाा प्रारंभ
- वास्तुविशारद व बांधकाम व्यावसायिकांनी घर बांधकामाचे प्लॅन्स बनवितानाच चिमण्या व पक्ष्यांसाठी आश्रयस्थाने निर्माण करण्यासाठी आवश्‍यक डिझाईन्सवर भर दिला
- टेरेस बागेत चिमण्या व पक्ष्यांसाठी सुविधा देताना फूडकोर्ट, वॉटर-ज्यूस सेंटर, स्वीमिंग सेंटर अशा संकल्पना पुढे आल्या आणि त्या यशस्वी झाल्या

कोट
सुरुवातीला चेतना विकास मंदिरमध्ये सुमारे १०० घरट्यांना प्रत्येक वर्षी मागणी असायची. ती आता ५०० वर पोहोचली असून, घरटे तयार करणाऱ्या संस्थांचीही संख्या वाढली आहे. लोकांमध्ये चांगली जागृती झाली असून चिमण्यांचा किलबिलाट पुन्हा अनुभवायला मिळत आहे.
- पवन खेबुडकर, चेतना विकास मंदिर

निसर्गमित्र संस्थेने चिमण्या व पक्ष्यांसाठी आवश्यक आचारसंहिता लोकांना समजून सांगण्यावर भर दिला आहे. दुधी भोपळा, टाकाऊ वस्तूंपासून घरच्या घरी घरटी कशी तयार करावी, याबाबतची प्रबोधन मोहीम हाती घेतली आहे.
- अनिल चौगुले, निसर्गमित्र संस्था

वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून चिमणी व पक्ष्यांसाठी जलपात्रे तयार केली जात आहेत. विद्यार्थी व पालकांचा अशा कार्यशाळांना प्रतिसाद मिळत असून, संस्थेकडील जलपात्र व घरट्यांची मागणी पाचपटीने वाढली आहे.
- अमोल बुड्ढे, वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशन

.........................
३ कॉलम/२ कॉलम
आयटी क्षेत्रातील नोकरी
सोडून चिमण्यासाठी काम

कोल्हापुरातील अमर संकपाळ हे आयटी क्षेत्रातील मोठ्या पगाराची नोकरी सोडून आणि विशाल पाटील यांनी पर्यावरण अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन बरेचं पक्षी आणि सर्प रेस्क्यू केलेले आहे. आता हे दोघेही चिमणी वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
ते सांगतात, ‘चिमण्यांना राहण्यासाठी सोयीस्कर जागा देऊ शकतो. आपण आपल्या घराबाहेर किंवा गॅलरीमध्ये त्यांना कृत्रिम घरटे उपलब्ध करून देऊ शकतो. त्याचबरोबर तुम्ही चिमण्यांना धान्य-पाण्याची सोय घरट्यापासून थोड्याच अंतरावर करून दिली तर खूपच छान.
चिमण्यांना घर देण्याचा फायदा असा की चिमण्या वेगवेगळ्या झाडांच्या बिया पसरवण्यासाठी खूप सक्रिय असतात त्यामुळे झाडांची संख्या वाढण्यात आणि जंगल पुनर्निर्माण करण्यात त्यांची खूप मोठी मदत होते. संपूर्ण वर्षभरात फक्त चार किलो धान्य आणि थोडसं पाणी यामुळे आपल्या पर्यावरणाचा समतोल साधून आपल्या सर्वांचे खूप मोठी मदत होऊ शकते.’

‘स्टार्टअप’च्या दिशेने काम
पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी नेस्टी स्टार्टअप या दिशेने काम करत आहे. ही कंपनी टाकाऊ साहित्यापासून चिमण्यांची कृत्रिम घरटी बनवते, जे तुम्ही ऑनलाईन किंवा व्हॉटस्‌अपच्या माध्यमातून खरेदी करू शकता. हे कृत्रिम घरटे पक्ष्यांच्या सोयीच्या हिशेबाने शास्त्रीयदृष्ट्या बनवलेले आहे. ही घरटी वाढदिवसाला लग्न समारंभात किंवा इतर कोणत्याही आनंदाच्या क्षणी गिफ्ट देऊ शकता, असे अमर संकपाळ सांगतात.