श्रीकांत नाईक यांच्या गौरवग्रंथाचे प्रकाशन
गौरवग्रंथाचे प्रकाशन

श्रीकांत नाईक यांच्या गौरवग्रंथाचे प्रकाशन गौरवग्रंथाचे प्रकाशन

gad194.jpg
90125
गडहिंग्लज : प्रा. श्रीकांत नाईक यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त गौरवग्रंथाचे प्रकाशन डॉ. सुनीलकुमार लवटे, अरुण नरके, डॉ. श्रीपाद जोशी, श्रीकांत नाईक आदींनी केले.
---------------------------
श्रीकांत नाईक यांच्या
गौरवग्रंथाचे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २० : येथील प्रा. श्रीकांत नाईक यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त गौरवग्रंथांचे प्रकाशन केले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. डॉ. श्रीपाद जोशी अध्यक्षस्थानी होते. गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके, रवींद्र आपटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कोल्हापूर येथील इंजिनिअर असोसिएशन हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला.
डॉ. लवटे म्हणाले, ‘श्रीकांत नाईक हे एक उपक्रमशील शिक्षक आहेत. अनेक चांगल्या पिढ्या घडवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. पुस्तकप्रेम व वाचन वेड हा त्यांचा श्वास आहे. त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशन झालेले गौरवग्रंथांचे खंड शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटकास मार्गदर्शक ठरतील.’ श्रीपाद जोशी यांचेही भाषण झाले.
सांस्कृतिक समाज पुरुष (खंड एक), शिक्षण मंथन (खंड दोन) आणि कृतार्थ मी कृतज्ञ मी, या पुस्तिकेचे प्रकाशन झाले. अक्षरदालनचे रवींद्र जोशी, नरके फाउंडेशनचे अध्यक्ष अरविंद ओबेराय, गौरवमूर्ती प्रा. श्रीकांत नाईक, आजरा कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, डॉ. व्ही. एम. मगदूम, डॉ. बी. एम. हिर्डेकर, शिवाजी परूळेकर, विलास कुलकर्णी, अनंत घोटगाळकर, रजनी हिरळीकर आदी उपस्थित होते. प्रा. सुभाष कवडे यांनी स्वागत केले. स्नेहा वाबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुभाष कोरे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com