सुपरस्पेशालीटी रिक्त पदे

सुपरस्पेशालीटी रिक्त पदे

‘सीपीआर’ला मिळणार
तीन नवीन विशेष तज्ज्ञ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या आठ सुपर स्पेशालिटी (अतिविशेषोपचार) हॉस्पिटलमधील अध्यापकीय संवर्गात सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापकांची ५९ पदे, तर लिपिक परिचारिका (क वर्ग) व सेवक, सफाई कर्मचारी (ड वर्ग) संवर्गातील १२१ पदे भरण्यात आली आहेत. यातील सीपीआर रुग्णालयास तीन नवीन विशेष तज्ज्ञ, डॉक्टर दहा, अन्य प्रशासकीय पदांची नियुक्ती होणार आहे.
सीपीआर रुग्णालयातील हृदयशस्त्रक्रिया विभागाला सुपर स्पेशालिटीचा (डीएम कार्डीयालॉजी) दर्जा मिळाला. त्यानुसार या विभागात एमडी किंवा एमएस दर्जाचे अजून तीन हृदयरोग तज्ञ डॉक्टर येणार आहेत. ते येथे उपचार सेवा देण्याबरोबर डीएम कार्डीलॉजीचे प्रशिक्षणही घेणार आहेत. अतिविशेषोपचार विषयातील रुग्णसेवेची निकड, तसेच पदव्युत्तर विद्यार्थी संख्या वाढविण्याच्या दृष्टीने मंबई, पुणेसह कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, येथील विशेषोपचार विषयातील काही अध्यापकीय पदांचे स्थानांतरण व रूपांतरण तसेच काही पदे रद्द करून नव्याने पदे निर्माण करण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com