
विद्यापीठ आंदोलन
विद्यापीठ सेवक संघाचे सदस्य
काळ्या फिती लावून करणार काम
कोल्हापूर, ता. १९ : जुनी पेन्शन लागू करा, या मागणीसाठी शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे सदस्य उद्याही (ता. २०) काळ्या फिती लावून काम करणार आहेत.
महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर सेवक समन्वय समितीतर्फे १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. सेवक संघाचे सदस्य जुनी पेन्शनसाठी आग्रही असून, त्यांनी संपात सहभाग घेतला आहे. विद्यापीठातील कामकाज सांभाळून ते संपात उतरले आहेत. महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार त्यांचा संप सुरू आहे. सेवक संघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी उद्यापासून (ता.२०) काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे उद्यापासून विभागातील कामकाजाबाबत काय होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजयसिंह जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘विभागातील नेमके किती कर्मचारी बेमुदत संपात सहभागी होणार आहेत, याचा आकडा माहीत नाही. परीक्षांची संख्या कमी असून, परीक्षा विभागातील कामकाज सुरळीत आहे.’