आप आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आप आंदोलन
आप आंदोलन

आप आंदोलन

sakal_logo
By

लेखी आश्वासनानंतर
‘आप’चे काम बंद
आंदोलन मागे

कोल्हापूर ः किमान वेतनाची हमी देणारी टिपर कर्मचाऱ्यांसाठी नवीन निविदा १५ दिवसांत काढण्याचे लेखी आश्‍वासन महापालिकेने दिल्यानंतर ‘आप’ने पुकारलेले सोमवारपासून कामबंदचे आंदोलन मागे घेतले.
टिपरचालकांच्या किमान वेतनासाठी आम आदमी पार्टीने दोन दिवस घंटानाद, ठिय्या आंदोलन केले. तसेच सोमवारपासून कामबंदचा इशारा दिला होता. प्रशासनासोबत शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा होऊन ठेकेदारांची बिले काढण्याआधी पगारपत्रक तपासले जाईल, किमान वेतन दिले जाते का पाहिले जाईल, जे किमान वेतन देत नाहीत त्यांचे कंत्राट रद्द केले जाईल, कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळेल याची हमी देणारी नवीन निविदा १५ दिवसांत काढू, असे लेखी आश्‍वासन प्रशासनाने शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे सोमवारपासून होणारे काम बंद आंदोलन मागे घेतल्याचे ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.