ई-स्टोअर फसवणूक तिघांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ई-स्टोअर फसवणूक तिघांवर गुन्हा
ई-स्टोअर फसवणूक तिघांवर गुन्हा

ई-स्टोअर फसवणूक तिघांवर गुन्हा

sakal_logo
By

ई-स्टोअर फसवणूकप्रकरणी आरोपपत्र दाखल

कोल्हापूर, ता. १९ ः ई-स्टोअर सुरू करून देतो, तीस लाख रुपये द्या. त्यातून तुम्हाला महिना अडीच लाखांचा फायदा होईल, असे सांगून ३८ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आला. या प्रकरणी विनायक कृष्णात राऊत (रा. कासारवाडा, ता. राधानगरी), प्रकाश शंकर चौगले (रा. शाहूपुरी, चौथी गल्ली, कोल्हापूर) आणि अरविंद सत्यनारायण मिश्रा (रा. राजारामपुरी सातवी गल्ली, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. शुभांगी पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी ई-स्टोअरची सुरुवात करून देतो. त्यातून तुम्हाला दर महिना अडीच लाखांचा नफा मिळेल असे सांगितले होते. यासाठी त्यांनी त्यांच्याकडून ३० लाख रुपये घेतले. तसेच पाटील यांनी संशयित आरोपींच्या सांगण्यावरून विविध कंपन्यांमध्ये ८ लाख रुपये गुंतवले होते. अशी एकूण मिळून सुमारे ३८ लाखांची ही फसवणूक होती. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. शाहूपुरी पोलिसांनी डिसेंबर २०२२ मध्ये वेदिका आयुरकेअर हेल्थ ॲण्ड रिटेल प्रा. लि. या कंपनीसह राऊत, चौगले, मिश्रा आणि विजय मारुती पाटील (रा. पणुंद्रे, ता. शिराळा, जि. सांगली) यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.