Wed, June 7, 2023

हद्दवाढीसाठी बैठक
हद्दवाढीसाठी बैठक
Published on : 19 March 2023, 3:57 am
जिल्हाधिकाऱ्यांना
आज भेटणार हद्दवाढ
कृती समितीचे कार्यकर्ते
कोल्हापूर ः हद्दवाढीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली नसल्याने कृती समितीचे कार्यकर्ते उद्या दुपारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. कार्यकर्त्यांनी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जमण्याचे आवाहन ॲड. बाबा इंदुलकर यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महिन्यात हद्दवाढविषयी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक आयोजित करतो, असे सांगितले होते. बैठक अजून झालेली नसल्याने सोमवारी (ता. २०) जिल्हाधिकारीऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे.