Thur, June 1, 2023

लैंगिक अत्याचार प्रकरणी तरुणाला अटक
लैंगिक अत्याचार प्रकरणी तरुणाला अटक
Published on : 19 March 2023, 7:11 am
90184
...
लैंगिक अत्याचारप्रकरणी तरुणाला अटक
कोल्हापूर ः अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या संशयावरून आज सुहास एकनाथ चौगले (वय १९, रा.कुर्डू, ता.करवीर) याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहास याची एका अल्पवयीन मुलीसोबत ओळख झाली. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून आणि नंतर धमकावून तीन वर्षे अत्याचार केले. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी संशयित चौगले याच्यावर गुन्हा दाखल केला होता. तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक मनीषा नारायणकर यांनी रविवारी कुर्डू येथून चौगले याला अटक केली.