प्राथमिक शाळांचा वीज पुरवठा राहणार सुरळीत

प्राथमिक शाळांचा वीज पुरवठा राहणार सुरळीत

प्राथमिक शाळांचा वीज पुरवठा राहणार सुरळीत
कोल्हापूर, ता. १९ : राज्यातील प्राथमिक शाळांच्या थकीत वीज बिलापोटी वीज पुरवठा खंडित करण्यात येत होता. अशा स्थितीत शाळांनी वीज भरण्यासाठी शासनाने निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे शाळांचा वीज पुरवठा खंडित होणार नाही, अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली आहे. त्यामुळे महावितरणकडून शाळांचा वीज पुरवठा खंडित करणे तूर्त थांबले आहे.
वीज बिलाच्या थकबाकीपोटी शाळांची वीज तोडली जाते, याबाबतच्या तक्रारी शालेय शिक्षणमंत्री यांच्यापर्यंत पोहचल्या होत्या. विधान परिषदेतही यावर प्रश्‍न उपस्थित झाला होता. तेव्हा प्राथमिक शाळांसाठी आकारले जाणारे वीज बिल हे घरगुती वीज दरापेक्षा कमी असावे, असा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार वीज बिलात सवलत दिल्यास बिल थकीत राहणार नाही, अशी अपेक्षा आहे. तसेच वीज पुरवठा खंडित करू नये, यासाठी महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत करार करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्‍वासन केसरकर यांनी दिले होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर शाळांचा वीज पुरवठा खंडित होण्याचे संकट तूर्त टळले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com