
कार व बाईक रॅली
90183
‘आरटीओ’तर्फे महिलांची कार व बाईक रॅली
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ता. १९ : सध्या महिला कोणत्याही क्षेत्रापासून अलिप्त राहिलेल्या नाहीत. सर्वच क्षेत्रात महिला धडाडीने काम करत आहेत. आज रस्ता सुरक्षा जनजागृती कार व बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या महिला हे महिलांच्या धाडसाचे द्योतक आहे, असे उदगार अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी काढले. रस्ते सुरक्षा जनजागृतीनिमित्त महिलांच्या कार व बाईक रॅलीचे उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिरकणी फाउंडेशन व कोल्हापूर जिल्हा वाहन वितरक संघटना यांच्यामार्फत रविवारी महिलांच्या आयोजन केले होते. प्रादेशिक परिवहन कार्यालयातून रॅलीची सुरुवात झाली. अप्पर पोलीस अधीक्षक देसाई, गृह पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. धैर्यप्रसाद हॉल, ताराराणी पुतळा, सायबर चौक, हॉकी स्टेडियम, इंदिरा सागर चौक, मिरजकर तिकटी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सी.पी.आर. हॉस्पिटल, महावीर कॉलेज, रेसिडेन्सी क्लब या मार्गावरुन प्रादेशिक परिवहन कार्यालयात रॅलीचा समारोप झाला.
परिवहन अधिकारी पाटील यांनी महिला चांगल्या प्रकारे चालकाचे काम करु शकतात असा संदेश या रॅलीद्वारे दिल्याटे सांगितले. रॅलीमध्ये १२५ दुचाकीसह महिला सहभागी झाल्या होत्या. सहभागी महिलांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.