मारामारी प्रकरणी गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मारामारी प्रकरणी गुन्हा दाखल
मारामारी प्रकरणी गुन्हा दाखल

मारामारी प्रकरणी गुन्हा दाखल

sakal_logo
By

आंबे पाडण्यास विरोध
केल्याने दमदाटी, तिघांवर गुन्हा

कोल्हापूर, ता. १९ ः घरासमोरील झाडाचे आंबे पाडण्यास विरोध केल्याने घरातील वृद्ध व्यक्तीला जांबियाचा धाक दाखवून शिवीगाळ करण्याचा प्रकार आज लक्षतीर्थ वसाहतीत घडला. या प्रकरणी सुमित स्वार्थिक कांबळे (रा. संभाजीनगर, कोल्हापूर), प्रणव महादेव वीर आणि शशांक महादेव वीर (दोघे रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर) यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रजीत सचिन जाधव (वय २९, रा. घर नं १३३५, डी वॉर्ड, लक्षतीर्थ वसाहत) यांच्या घरासमोर आंब्याचे झाड आहे. संशयित आरोपी या झाडाला दगड मारून कैऱ्या पाडत होते. यावेळी इंद्रजीत यांच्या वडिलांनी त्यांना दगड मारू नका, असे सांगितले. याचा राग आल्याने या तिघांनी घरात घुसून इंद्रजीत यांच्या वडिलांना जांबियाचा धाक दाखवून धमकावले आणि शिवीगाळ केली. वडिलांनी हा प्रकार फोनवरून इंद्रजीत यांना सांगितला. ते आपल्या मित्रांसह घरी आले. यावेळी या तिघांनी जांबिया घेऊन त्यांच्या अंगावर धाव घेतली. त्यांना धाक दाखवून शिवीगाळ केली. याची फिर्याद इंद्रजीत यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.