
स्थानिक गुन्हे अन्वेषण मुलाखती
स्थानिक गुन्हे अन्वेषणसाठी मुलाखती
कोल्हापूर ः स्थानिक गुन्हे अन्वेषणमध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेण्याचे काम सध्या सुरू आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक महादेव वाघमोडे या मुलाखती घेत आहेत. यातून स्थानिक गुन्हे अन्वेषणची नवी टीम तयार केली जाईल. पोलिस दलामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला विशेष महत्त्व आहे. गुंतागुंतीचे तपास, जुन्या गुन्ह्यांचे तपास आणि विशेष मोहीम राबवण्याचे काम या विभागाकडे असते. काही दिवसांपूर्वी मुदत संपल्याने या विभागातील ११ कर्मचाऱ्यांची बदली झाली. काही जणांची बदली होणार आहे तर काही जण पुढील एक-दोन महिन्यात निवृत्त होतील. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषणची टिम नव्याने करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. यासाठी इच्छुक कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांची निवड केली जाईल. आजपासून तीन दिवस या मुलाखती होणार आहेत.