Sun, May 28, 2023

इचलकरंजीत आज बलिदान मास सांगता
इचलकरंजीत आज बलिदान मास सांगता
Published on : 20 March 2023, 2:50 am
बलिदान मासाची
आज सांगता
इचलकरंजी : छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास सांगता उद्या (ता. २१) दुपारी चार वाजता आहे. यावेळी शहरातून ज्वालेसह मूक पदयात्रा काढून व देश आणि धर्म रक्षणाची शपथ घेण्यात येणार असल्याची माहिती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गजानन महाजन यांनी दिली. शहरात १६ वर्षांपासून हा मास पाळला जातो. शहरातील विविध चौकांत छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. यावर्षी २० फेब्रुवारीला बलिदान मास सुरू झाला. त्याची सांगता उद्या दुपारी चार वाजता मंगलधाम गणपती मंदिर येथून मूकपदयात्राने होणार आहे. यात सर्व धारकरी व धर्मप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.