क्रीडांगणाचे काम पूर्ण करण्याची घाटगेंकडे मागणी

क्रीडांगणाचे काम पूर्ण करण्याची घाटगेंकडे मागणी

gad205.jpg
90278
गडहिंग्लज : क्रीडांगणाचे काम पूर्ण करण्याच्या मागणीचे निवेदन भ्रमंती वॉकिंग ग्रुपच्या शिष्टमंडळाद्वारे समरजित घाटगे यांना दिले.
-----------------------------------------------------------------
क्रीडांगणाचे काम पूर्ण
करण्याची घाटगेंकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. 20 : वडरगे रोडवरील मंजूर झालेल्या क्रीडांगणाचे काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी भ्रमंती वॉकिंग ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांना निवेदन दिले.
शहरातील पत्री बागेच्या शेजारी दहा एकर जागेवर क्रीडांगण उभारण्यात येणार आहे. जागेची मोजणी व सपाटीकरण करुन ताब्यात घेतली आहे. शासनाने काही टोकन निधीही त्यासाठी मंजूर केला आहे, परंतु काही शासकीय तांत्रिक कारणांमुळे या क्रीडांगणाचे काम रखडले आहे. या क्रीडांगणाचे काम मार्गी लावण्यासाठी आपण लक्ष घातलयास हे काम पूर्णत्वाला जाईल, असा विश्‍वास आहे. क्रीडांगणामुळे शहरातील जनतेची मोठी सोय होणार असून, शाळांनासुद्धा विविध क्रीडा स्पर्धा भरविण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. नवोदित खेळाडूंना सरावासाठी हे क्रीडांगण उपयुक्त ठरणार आहे. आप्पासाहेब पाटील, संजय मोहिते, विक्रांत गुरव, अरुण भोसले, गजानन शिवणे, अर्जुन चौगुले, आणाप्पा गाडवी, गौरव देशपांडे, शरद येसरे, सुरेश दास, अमित रजपूत, उत्तम आंबी आदींच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले आहे.
--------------------------------------------------
श्री. अजित माद्याळे...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com