चंदगडला कर्मचाऱ्यांचा मूक मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगडला कर्मचाऱ्यांचा मूक मोर्चा
चंदगडला कर्मचाऱ्यांचा मूक मोर्चा

चंदगडला कर्मचाऱ्यांचा मूक मोर्चा

sakal_logo
By

chd201.jpg
90303
चंदगड ः जुनी पेन्शन मागणीसाठी मूक मोर्चात कर्मचारी सहभागी झाले.
------------------------------------
चंदगडला कर्मचाऱ्यांचा मूक मोर्चा
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २० ः जूनी पेन्शन मिळावी या मागणीसाठी राज्यभरात लढा तीव्र होत असताना चंदगड तालुक्यातूनही त्याला प्रतिसाद मिळत आहे. आज शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शहरातून मूक मोर्चा काढून या मागणीकडे लक्ष वेधले.
सर्व कर्मचारी पंचायत समितीच्या आवारात एकत्र जमले. प्रमुख संघटनांच्या प्रतिनिधींची भाषणे झाली. जूनी पेन्शन हा आपला हक्क असून तो मिळवल्याशिवाय गप्प रहायचे नाही असा निश्चय केला. जे कर्मचारी आंदोलनापासून दूर आहेत त्यांची समजूत काढून त्यांनाही सामावून घेण्याचे ठरले. तालुका मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक समिती, पुरोगामी शिक्षक संघटना, जूनी पेन्शन हक्क संघटना, पदवीधर प्राथमिक शिक्षक सभा, विमुक्त जाती शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषद, चंदगड तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटना, महसूल विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, कनिष्ट महाविद्यालयीन संघटना, ग्रामसेवक संघटना, जि. प. लिपिक कर्मचारी संघटना आदी संघटनांचे कर्मचारी सहभागी झाले होते.