Mon, June 5, 2023

इचल : डीकेटीई कार्यक्रम
इचल : डीकेटीई कार्यक्रम
Published on : 20 March 2023, 2:27 am
‘डीकेटीई’मध्ये उद्या
मराठी गीतांचा कार्यक्रम
इचलकरंजी, ता. २० ः येथील ‘डीकेटीई’च्या राजवाड्यामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त ‘स्वरप्रभात-मराठी गाते अशी’ हा खास मराठी गीतांचा कार्यक्रम बुधवारी (ता. २२) पहाटे ४.३० ला आयोजित केला आहे. हा कार्यक्रम डीकेटीई, आपटे वाचन मंदिर व पंडित बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. कार्यक्रमात पं. बाळकृष्ण बुवा मंडळाचे कलाकार व डीकेटीईच्या बालवृंदाचे विद्यार्थी संगीताची कला सादर करणार आहेत. कार्यक्रमास येताना पारंपरिक पोशाखात उपस्थित राहावे, असे अवाहन संयोजकांनी केले आहे.
................