
राजाराम अर्ज
लोगो
...
पहिल्याच दिवशी महाडिकांसह १७ जणांचे अर्ज
‘राजाराम’ चा आखाडा ः २१६ उमेदवारी अर्जांची विक्री
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० ः कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक, कारखान्याचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्यासह १७ जणांचे अर्ज दाखल झाले. आज २१६ उमेदवारी अर्जांची विक्री झाली. या निवडणुकीसाठी महादेवराव महाडिक यांनी संस्था गटातून तर अमल यांनी गट क्रमांक दोनमधून अर्ज दाखल केला.
`राजाराम’ साठी २३ एप्रिल रोजी मतदान होत आहे. आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांच्या कार्यालयात ही प्रक्रिया सुरू झाली. अर्ज भरण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत होती, पण सकाळी सात वाजल्यापासूच अर्ज घेण्यासाठी इच्छुकांनी कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. कार्यालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर अर्ज घेऊन लगेच १७ उमेदवारांनी ते दाखलही केले.
आज अर्ज दाखल केलेल्या अन्य प्रमुखांत कारखान्याचे माजी अध्यक्ष दिलीप उलपे, सर्जेराव माने, संचालक वसंत बेनाडे, तानाजी पाटील, शिवाजी किबिले, विलास यशवंत जाधव, बाबूराव बेनाडे, किरण भोसले, शिवाजी पाटील, सर्जेराव भंडारे यांच्यासह किरण यशवंत जाधव, डॉ. मारूती किडगांवकर, दगडू मारूती चौगुले, संतोष बाबूराव पाटील, देवाप्पा मुधाळे यांचा समावेश आहे. २७ मार्च हा अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असून उमेदवारी अर्जांची छाननी २९ मार्च रोजी होणार आहे. १२ एप्रिल हा या निवडणुकीतील अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे.