प्रशिक्षण घेवून स्वावलंबी व्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशिक्षण घेवून स्वावलंबी व्हा
प्रशिक्षण घेवून स्वावलंबी व्हा

प्रशिक्षण घेवून स्वावलंबी व्हा

sakal_logo
By

gad209.jpg
90336
गडहिंग्लज : महिला प्रशिक्षण कार्यक्रमात मीना रिंगणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बाबासाहेब मार्तंड, सीमा साळुंखे, श्‍वेता टोणन्नावर, शुभांगी बुटे उपस्थित होते.
------------------------------------------------------
प्रशिक्षण घेवून स्वावलंबी व्हा
मीना रिंगणे : ‘रवळनाथ’तर्फे महिला प्रशिक्षणास प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २० : महिलांमध्ये पाककलेसह अनेक कला व कौशल्ये असतात. त्याला प्रशिक्षणाची आणि व्यावसायिकतेची जोड देवून महिलांनी स्वत:च्या पायावर उभे रहावे, असे आवाहन प्राचार्या मीना रिंगणे यांनी केले.
दिल्लीच्या राष्ट्रीय सहकारी संघाच्या सहकार्याने रवळनाथ को-ऑप हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे आयोजित महिला उद्योजकता विकास प्रशिक्षणाच्या उद्‍घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. त्यांच्याहस्ते फॅशन डिझायनिंग व कापडी पिशवी तयार करण्याच्या प्रशिक्षणाचा प्रारंभ झाला. दरम्यान, संस्थेतर्फे घेण्यात येणारे महिन्याभरातील हे दुसरे प्रशिक्षण आहे. प्रशिक्षणात ८० महिलांनी सहभाग घेतला आहे.
रिंगणे म्हणाल्या, ‘रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी गडहिंग्लज परिसरातील गरजू महिलांसाठी दिल्लीहून विविध कोर्सेसना परवानगी आणली आहे. महिलांच्या सर्वांगिण प्रगतीला चालना देण्याचा त्यांचा मानस आहे.’ जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब मार्तंड, श्‍वेता टोणन्नावर, प्रशिक्षिका स्नेहल दंडगे, स्वप्नाली निंबाळकर, सविता मांडेकर, रत्नमाला मांडे, तेजस्विनी हिरेमठ उपस्थित होते. प्रशिक्षिका सीमा साळुंखे यांनी स्वागत केले. शुभांगी बुटे यांनी आभार मानले.