बदलत्या शिक्षणाची आव्हाने

बदलत्या शिक्षणाची आव्हाने

क्लिपार्ट
90355

उत्तम संधी देणारी
शाळा सर्वोत्तम

लीड
नवे शैक्षणिक धोरण (एईपी) आराखडा घेऊन उभे आहे. यात केलेले बदल योग्य पद्धतीने समजावून घेऊन सर्वच कार्यपद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. स्वयंशिक्षणाची उत्तम संधी पुरवणारी शाळा व्यक्तिगत शिक्षण देणारी, आनंदमय वातावरण पुरवणारी, छोटी छोटी आव्हाने निर्माण करून विविध क्षमता वाढवणारी, आवडी-निवडीचे स्वातंत्र्य देणारी, भावनांची कदर करणारी, व्यक्तिमत्त्वाचा आदर करणारी अशी विविधांगी संधी पुरवून विकासाला मदत करणारी म्हणजे उत्तम शाळा.
----------------------

शिक्षण कशासाठी, असा जर का प्रश्न मनात डोकावला तर त्याचे सोपे उत्तर आहे जीवनासाठी. भविष्यकाळ सुकर करण्यासाठी लागणाऱ्या क्षमता जर शिक्षण पुरे करू शकत नसेल तर शिक्षण व्यर्थ आहे. जीवनाशी जोडणारे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक मुलामध्ये उपजत शिकण्याची आवड असते. जर शाळांनी ती जोपासली तर मुले सरसर शिकतात. आनंदाने नव्या गोष्टी आत्मसात करतात. काळानुरूप शिक्षण पद्धतीत क्रांती झालेली आहे. वर्तनवादातून रचनावादाकडे शिक्षणाची वाटचाल जोरात सुरू आहेच; परंतु काही शिक्षण संस्था जुन्याच पद्धतीला कवटाळून आहेत. शाळेचा निकाल गुणात्मक १०० टक्के हेच ध्येय टिकवण्यात अनेक शाळा अडकलेल्या आहेत. नवे शैक्षणिक धोरण (एईपी) या सर्वांचा सविस्तर आराखडा घेऊन उभे आहे. यात केलेले बदल योग्य पद्धतीने समजावून घेऊन सर्वच कार्यपद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. उत्तम शाळा कोणती याची काही गृहितके समजणे महत्त्वाचे आहेच. स्वयंशिक्षणाची उत्तम संधी पुरवणारी शाळा व्यक्तिगत शिक्षण देणारी, आनंदमय वातावरण पुरवणारी, छोटी-छोटी आव्हाने निर्माण करून विविध क्षमता वाढवणारी, आवडी-निवडीचे स्वातंत्र्य देणारी, भावनांची कदर करणारी, व्यक्तिमत्त्वाचा आदर करणारी अशी विविधांगी संधी पुरवून विकासाला मदत करणारी म्हणजे उत्तम शाळा. नव्या धोरणांतर्गत शिक्षणात महत्त्वाचे बदल झालेले आहेत. शिक्षणाचे उद्दिष्ट बदललेले आहे. शिक्षणाचा आशयदेखील बदलला आहे आणि यामुळे अर्थातच अध्ययन अध्यापन व मूल्यमापन नक्कीच बदललेले आहे. म्हणून शिक्षकाची भूमिका व मानसिकता जुनी राहून चालणार नाही. शिक्षण दोन माध्यमांतून होत असते. एक शाळा तर दुसरा समाज संस्कृतीतून मूल खूप काही शिकते. तंत्रविज्ञान, विज्ञान, भाषा यात होणाऱ्या प्रगतीमुळे नव्या गरजा निर्माण होतात व त्यामुळे शिक्षणदेखील बदलावे लागते. यात पालक घटक तितकाच महत्त्वाचा आहे. त्यांना या नव्या प्रवाहात सामावून घेणे ही शाळांची जबाबदारी आहे. योग्य मार्गदर्शन झाल्यास पालकवर्गदेखील आपल्या कामात नक्कीच हातभार लावतो. शिक्षक, पालक, संस्थाचालक या सर्वांच्या एकत्र समीकरणाने नव्या दिशेने जाणे योग्य होईल. यातील प्रत्येक घटकाला जबाबदारी समजणे गरजेचे आहे.
- नीतूदेवी पंडित बावडेकर शिक्षणतज्ज्ञ,
अध्यक्ष, श्रीमंत माईसाहेब बावडेकर शिक्षणसंकुल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com